Posts

१०५ वर्षांची महिला युद्ध वार्ताहर- क्लेअर हाॅलिंगवर्थ

१०५ वर्षांची महिला युद्ध वार्ताहर- क्लेअर हाॅलिंगवर्थ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? तब्बल १०५ वर्षे जगून तिने १० जानेवारी २०१७ ला जगाचा निरोप घेतला आहे. मुळात १०५ वर्षांचं आयुष्य वाट्याला येणं ही सामान्य बाब नव्हे. पण ज्या व्यक्तीच्या वाट्याला हे दीर्घ आयुष्य आलं ती व्यक्ती एक महिला पत्रकार होती, हे विशेषच म्हटले पाहिजे. याशिवाय आणखी वेगळी बाब आहे ती अशी की, तिच्या खाती विसाव्या शतकातील जागतिक महत्त्वाची बातमी प्रथम देण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. कोणती होती ही खास बातमी? ‘दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला आहे’, हे तिने जगाला प्रथम सांगितले. त्या वार्ताहर महिलेचे नाव आहे, क्लेअर हाॅलिंगवर्थ. बड्या राष्ट्रांनी झेकोस्लोव्हाकियाचा बळी दिला - १९३९ सालची गोष्ट आहे. युद्धखोर हिटलरचे तुष्टीकरणाच्या (अपीझमेंट) नीतीचा अवलंब करून समाधान करावे व युद्ध टाळता आले तर पहावे, या हेतूने युरोपातील बडी राष्ट्रे तडजोडीसाठी अटोकाट प्रयत्न ...

गाथा ही आईनस्टीनच्या अर्धांगिनीची

गाथा ही आईनस्टीनच्या अर्धांगिनीची वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? जगविख्यात पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टीनची प्रथम पत्नी मिलेव्हा हिचा जन्म आजच्या सर्बियामधील पण १८७५ सालच्या आॅस्ट्रिया - हंगेरीमधील तितेल गावी १९ डिसेंबर ला झाला. म्हणजे १९ डिसेंबर २०१६ ला तिचा १४१ वा वाढदिवस होता.  नोबेल पारितोषिक विजेता म्हणून तसेच जगातील विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणूनही अलबर्ट आईनस्टीनचा जगभर गौरव केला जातो. पण त्यामानाने त्याच्या अर्धांगिनीचा मिलेव्हाचा उल्लेख क्वचितच होतो. वस्तुस्थिती ही आहे की, मिलेव्हाचे अलबर्ट आईनस्टीनच्या संशोधनात बरोबरीचे योगदान होते. ही बाब आता २०१६ साली जगासमोर येते आहे. पण तिच्या वाट्याला ही उपेक्षा का?  बायकांना अक्कल नसते?-  ‘बायकांना अक्कल नसते’, या समजुतीच्या काळात जन्म झाला हाच कायतो पूर्वाश्रमीच्या मिलेव्हाचा मेरिकचा म्हणजेच उत्तराश्रमीच्या मिलेव्हा अलबर्टचा अपराध...

पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’

पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’ शिक्षक संघटनेच्या कामाच्या निमित्ताने माझा काणे कुटुंबाशी अतिशय घनिष्ठ परिचय आहे. वसंतराव काणे यांच्या सुविद्य पत्नी पुष्पा काणे यांनी नोकरी व घर सांभाळून वसंतरावांना साथ दिल्यामुळेच ते शिक्षक परिषदेची कामं करू शकले. या काळात माझा पुष्पावहिनींचे जीवन आणि कार्य यांच्याशी जवळून परिचय झाला होता. त्यांचे १३ जानेवारीला निधन झाले ही वार्ता कानी पडली आणि आठवणींचा पट क्रमाक्रमाने उलगडू लागला. आकाशवाणीच्या नागपूर आणि पुणे केंद्राशी संबंधित रसिकांना पुष्पा काणे यांचा नव्याने परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. पण ही जुनी पिढी आता हळूहळू काळाच्या पडद्याआड होत चालली आहे. तसेच रेडिओच्या मागून आलेले दूरचित्रवाणी हे धाकटे भावंडं कानामागून येऊन चांगलेच तिखट झाले आहे. तरीही पुष्पा काणे यांचा कर्तृत्वशाली जीवनपट नव्या पिढीलाही प्रेरणादायक ठरावा असा आहे. कर्तृत्वाची चढती कमान १९६१ ते १९९४ या प्रदीर्घ कालखंडातील दोन तीन वर्षे वगळता सतत कार्यरत होत्या. ‘वनिताविश्‍वात’ कंपेरर, नंतर अनाऊन्सर, न्यूज रीडर, स्क्रीप्ट रायटर, ड्रामा प्रोड्युसर आणि असिस्टंट स्टेशन ड...

पत्रकारितेतील महामेरू - बेंजामिन ब्रॅडली

पत्रकारितेतील महामेरू - बेंजामिन ब्रॅडली वसंत गणेश काणे, बीएससी; एम ए (मानसशास्त्र); एम एड एल बी ७; लक्ष्मीनगर, नागपूर ४४० ०२२              (0712)2221689/ 9422804430 Email – kanewasant@gmail.com / Blog –kasa mee? वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला आपल्या सव्वीस वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी जागतिक कीर्ती मिळवून देणारा  बेंजामिन ब्रॅडली हा वयाच्या ९३ व्या वर्षी २१ ऑक्टोबर २०१४ ला निधन पावला. १९६५ साली त्याने वाशिंग्टन पोस्टची धुरा सांभाळली आणि तोपर्यंत एका महानगरातील दैनिक स्वरूपात चाकोरीबद्ध पद्धतीने प्रसिद्ध होणाऱ्या वाशिंग्टन पोस्टचे एका राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर परिणाम करण्याची क्षमाता असलेल्या दैनिकात रुपांतर करूनच त्याने विश्रांती घेतली. वृत्तमूल्य असलेल्या वार्ता आक्रमक पद्धतीने वाचकांसमोर मांडणाच्या  त्याच्या  संपादकीय भूमिकेलाच त्याच्या यशाचे मुख्य श्रेय आहे, असे मानले जाते. प्रफुल्ल व्यक्तिमत्वाची देणगी ही त्याची जन्मजात कमाई होती, तर  नेतृत्व गुण ही त्याची आपकमाई होती. गुणवत्तायुक्त सहकाऱ्यांची निवड करण्याचे त्याचे क...

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू वसंत गणेश काणे,   बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॅार्क, पेन्सिलव्हॅनिया E mail - kanewasant@gmail.com                                                                                       Blog - kasa mee?             'ए ब्युटिफुल माईंड' या आॅस्कर विजेत्या चित्रपटाचा प्रेरणाश्रोत, विख्यात गणितज्ज्ञ, निर्णयक्षमतेशी संबंधित गणितातील गेम थिअरीचा जनक, अर्थशास्त्रातील १९९४ चा नोबेल पारितोषिक विजेता, आठवड्यापूर्वीच गणितातील अतिशय मानाच्या ॲबेल पारितोषिकाने गौरवांन्वित झालेला विजेता,  शिझोफ्रेनिया या मनाचा कॅन्सर समजल्या जाणाय्रा रोगाला औषधांच्या नव्हे तर मनोबलाच्या सहाय्याने ...

एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय

‘एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय वसंत गणेश काणे एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ बी एस्सी; एम ए(मानसशास्त्र); एम.एड. Email – kanewasant@gmail.com ; Blog – kasa mee? 0712)2221689, 9422804430 हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane, York, PA. USA यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया ‘एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक म्हणूनही ओळखला जातो. टॉलस्टायच्या कादंबऱ्यांचे विश्व साहित्यात अमर स्थान आहे. मानवाच्या मनाच्या नेणिवेतील मनोव्यवहारांचे वर्णन करण्याची त्याची क्षमता केवळ वादातीतच नाही तर आजही ते स्थान तसेच कायम आहे आणि भविष्यातही ते तसेच राहणार आहे. त्याचे एका हिंदूस लिहिलेले पत्र तर आम्हा भारतीय लोकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कदाचित या पत्रामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे. वयाच्या तीस वर्षानंतर टॉलस्टायच्या जीवनाला नैतिक आणि धार्मिक आधिष्ठान प्राप्त झाले. दुष्टाव्याचा विरोध अहिंसक मार्गाने करण्याच्या त्याच्या  भूमिकेमुळे महात्मा गांधी प्रभावित झाले होते, असे मानतात. या दोन महापुरुषांमधील संब...

हान्स माॅमसेनचा मृत्यू - एका वादग्रस्त इतिहासकाराची अखेर

                                                              हान्स माॅमसेन एका वादग्रस्त इतिहासकाराची अखेर वसंत गणेश काणे,   बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?         हान्स माॅमसेन हा जर्मन इतिहासकार हे एक अनेक प्रकारे वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ५ नोव्हेंबर १९३० साली जुळ्या भावासोबत जन्म घेऊन ५ नोव्हेंबर २०१५ लाच म्हणजेच वाढदिवशीच त्याने इहलोकीची यात्रा संपविली आणि तो चिरनिद्रेच्या कुशीत विसावला. आता कधी कुणास ठावूक निर्णयाचा दिवस (जजमेंट डे) उजाडेल, त्या दिवशी पापपुण्याची मोजणी होईल आणि पुढील  मार्गाची दिशा निश्चित होईल. तो पर्यंत त्याच्या आत्म्याला विश्रांती मिळावी,अशी विनंती जगातील त्याचे चाहते आणि विरोधक या दोघांनीही केली असणार. पण तो वैचारिक दृष्ट्या डावीकड...