जाॅन स्टिवर्ट
जाॅन स्टिवर्ट
वसंत काणे
जाॅन स्टिवर्ट हा अमेरिकेत विनोदवीर, अभिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, समीक्षक आणि टिव्ही शो मधील सुत्रधार ( होस्ट) म्हणून विख्यात आहे. त्याचे नाव जोनॅथन असे असले तरी तो 'जाॅन' म्हणून (नावाच्या लघुरूपात) अमेरिकन जनतेत ओळखला जातो. जसे बिल गेट्स, बिल क्लिंटन यांचे नाव ' विलीयम' असे आहे, पण सगळे त्यांना 'बिल' म्हणूनच संबोधतात, तसाच हा प्रकार आहे. बेनजॅमिनचे 'बेन', एलिझाबेथचे 'लिबी' असा प्रकार इथे सर्रास रूढ आहे. १९९९ ते२०१५ ते पर्यंतचा त्याचा 'डेली शो' अजूनही लोक विसरलेले नाहीत. हा शो जसा लोकप्रिय होता, तसाच तो समिक्षकांकडूनही वाखाणला जायचा. विनोद आणि वक्रोक्ती ह्या दोन सशक्त स्तंभांवर त्याचा शो आधारलेला असे. यातून जाॅर्ज बुश यांच्यासारखे अमेरिकेचे अध्यक्षही सुटले नव्हते. त्यांची सतत अडखळण्याची म्हणा किंवा शब्द लगेच न सुचल्यामुळे मध्ये बराच विराम घेण्याच्या सवयीची तो अनेकदा टिंगल उडवीत असे. जागतिक कीर्तीचा एकही नेता त्याच्या तावडीतून सुटला नसेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला मात्र तो फारसा गेला नव्हता. त्यावेळी भारतात निवडणूक नुकतीच पार पडली होती. त्यामुळे मोदींची अमेरिकेतील पत्रकारांना फारशी ओळख झाली नव्हती, अशीही शक्यता आहे. 'मी कोणत्याच पक्षाचा नाही, माझी भूमिका 'अपक्ष' आहे, असे तो म्हणायचा. पण डेमोक्रॅट पक्षापेक्षा रिपब्लिकन पक्षाची टिंगलटवाळी तू जास्त करतोस, असा त्याच्यावर रिपब्लिकन धार्जिण्यांचा आक्षेप होता. एकाने तर त्याला या मुद्यावरून डिवचलेच. यावर
हजरजबाबी जॅान म्हणाला, ' डेमोक्रॅट पक्षावरह बोलावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण काय करू आपली रिपब्लिकन नेते मंडळी ( आपल्या इथल्यासारख्या दिग्विजयी नेत्यांचा नावे सांगून तो म्हणाला) मला इतरांकडे लक्ष द्यायला सवडच मिळू देत नाहीत.( आणि प्रक्षेपणाचा वेळ संपतो). त्यामुळे माझा नाइलाज होतो बघा. हजरजबाबीपणात( रिपार्टी) त्याचा हात धरणारा, क्वचितच कुणी असेल.

Comments
Post a Comment