१०५ वर्षांची महिला युद्ध वार्ताहर- क्लेअर हाॅलिंगवर्थ
१०५ वर्षांची महिला युद्ध वार्ताहर- क्लेअर हाॅलिंगवर्थ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? तब्बल १०५ वर्षे जगून तिने १० जानेवारी २०१७ ला जगाचा निरोप घेतला आहे. मुळात १०५ वर्षांचं आयुष्य वाट्याला येणं ही सामान्य बाब नव्हे. पण ज्या व्यक्तीच्या वाट्याला हे दीर्घ आयुष्य आलं ती व्यक्ती एक महिला पत्रकार होती, हे विशेषच म्हटले पाहिजे. याशिवाय आणखी वेगळी बाब आहे ती अशी की, तिच्या खाती विसाव्या शतकातील जागतिक महत्त्वाची बातमी प्रथम देण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. कोणती होती ही खास बातमी? ‘दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला आहे’, हे तिने जगाला प्रथम सांगितले. त्या वार्ताहर महिलेचे नाव आहे, क्लेअर हाॅलिंगवर्थ. बड्या राष्ट्रांनी झेकोस्लोव्हाकियाचा बळी दिला - १९३९ सालची गोष्ट आहे. युद्धखोर हिटलरचे तुष्टीकरणाच्या (अपीझमेंट) नीतीचा अवलंब करून समाधान करावे व युद्ध टाळता आले तर पहावे, या हेतूने युरोपातील बडी राष्ट्रे तडजोडीसाठी अटोकाट प्रयत्न ...